Maruti Stotra

भीमरूपी महारुद्रा, वज्रहनुमान मारुती
वनारी अंजनीसूता रामदूता प्रभंजना
महाबळी प्राणदाता, सकळां उठवी बळें
सौख्यकारी शोकहर्ता, दुत वैष्णव गायका

दीनानाथा हरीरूपा, सुंदरा जगदांतरा
पाताळदेवताहंता, भव्यसिंदूरलेपना
लोकनाथा जगन्नाथा, प्राणनाथा पुरातना
पुण्यवंता पुण्यशीला, पावना परितोषका

ध्वजांगे उचली बाहो, आवेशें लोटला पुढें
काळाग्नी काळरुद्राग्नी, देखतां कांपती भयें
ब्रह्मांडे माईलें नेणों, आवळे दंतपंगती
नेत्राग्नीं चालिल्या ज्वाळा, भ्रुकुटी ताठिल्या बळें

पुच्छ ते मुरडिले माथा, किरीटी कुंडले बरीं
सुवर्ण कटी कांसोटी, घंटा किंकिणी नागरा
ठकारे पर्वता ऐसा, नेटका सडपातळू
चपळांग पाहतां मोठे, महाविद्युल्लतेपरी

कोटिच्या कोटि उड्डाणें, झेपावे उत्तरेकडे
मंद्राद्रीसारिखा द्रोणू, क्रोधें उत्पाटिला बळें
आणिला मागुतीं नेला, आला गेला मनोगती
मनासी टाकिलें मागें, गतीसी तुळणा नसे

अणुपासोनि ब्रह्मांडाएवढा होत जातसे
तयासी तुळणा कोठे, मेरू मंदार धाकुटे
ब्रह्मांडाभोवतें वेढें, वज्रपुच्छें करू शकें
तयासी तुळणा कैची, ब्रह्मांडी पाहता नसे

आरक्त देखिलें डोळा, ग्रासिलें सूर्यमंडळा
वाढतां वाढतां वाढें, भेदिलें शून्यमंडळा
धनधान्य पशूवृद्धि, पुत्रपौत्र समस्तही
पावती रूपविद्यादी, स्तोत्रपाठें करूनियां

भूतप्रेतसमंधादी, रोगव्याधी समस्तही
नासती तूटती चिंता, आनंदे भीमदर्शनें
हे धरा पंधरा श्लोकी, लाभली शोभली बरी
दृढदेहो निसंदेहो, संख्या चन्द्रकळागुणें

रामदासी अग्रगण्य, कपिकुळासि मंडणू
रामरूपी अंतरात्मा, दर्शनें दोष नासती

इति श्रीरामदासकृतं संकटनिरसनं मारुतिस्तोत्रं संपूर्णम्



Credits
Writer(s): Traditional, Ashwini Bhide Deshpande
Lyrics powered by www.musixmatch.com

Link