Ghar Asave Gharasarkhe

घर असावे घरासारखे, घर असावे घरासारखे
नकोत नुसत्या भिंती, नकोत नुसत्या भिंती
इथे असावा प्रेम-जिव्हाळा, इथे असावा प्रेम-जिव्हाळा
नकोत नुसती नाती, नकोत नुसती नाती
घर असावे घरासारखे...

त्या शब्दांना अर्थ असावा...
त्या शब्दांना अर्थ असावा नकोच नुसती वाणी
सूर जुळावे परस्परांचे नकोत नुसती गाणी
—नकोत नुसती गाणी
घर असावे घरासारखे...

त्या अर्थाला...
त्या अर्थाला अर्थ असावा...
त्या अर्थाला अर्थ असावा नकोत नुसती नाणी
अश्रूतुन ही प्रीत झरावी नकोच नुसते पाणी
—नकोच नुसते पाणी, —नकोत नुसती नाणी
घर असावे घरासारखे...

या घरट्यातुन पिल्लू उडावे दिव्य घेऊनी शक्ती
या घरट्यातुन पिल्लू उडावे दिव्य घेऊनी शक्ती
आकांक्षांचे पंख असावे उंबरठ्यावर भक्ती
—उंबरठ्यावर भक्ती, —नकोत नुसत्या भिंती
घर असावे घरासारखे...
घर असावे घरासारखे...



Credits
Writer(s): Shridhar Phadke, Vimal Limaye
Lyrics powered by www.musixmatch.com

Link