Tu Bhet Na

आभाळ झाले आज सोनेरी
वाऱ्यावरी जणू कस्तुरी

आभाळ झाले आज सोनेरी
वाऱ्यावरी जणू कस्तुरी
वाटा फुलांनी साऱ्या मोहरती
मन माझे सांगे माझ्या कानाशी

रंग हा सारा नवा-नवा
वाटे हवा-हवा गंध हा
स्पर्श हा करी वेडापिसा
लागे जिवा तुझा छंद हा

तू भेट ना आता पुन्हा
बस एकदा तू भेट ना
क्षण बावरे हसती पुन्हा
बस एकदा तू भेट ना

बघता-बघता येईल आता
क्षण तो आपला
हसता-हसता येतील आसू
पाहताना तुला

श्वासातली ही आर्जवे
तू ऐक ना, तू बोल ना

तू भेट ना आता पुन्हा
बस एकदा तू भेट ना
क्षण बावरे हसती पुन्हा
बस एकदा तू भेट ना

हरवून गेल्या किती राती
शोधताना कुणी
बरसून गेल्या सरी साऱ्या
तरी कोरडा मी

सारे रिते, सारे सुने
तुझियाविना, तू भेट ना

आभाळ झाले आज सोनेरी
वाऱ्यावरी जणू कस्तुरी
वाटा फुलांनी साऱ्या मोहरती
मन माझे सांगे माझ्या कानाशी

तू भेट ना आता पुन्हा
बस एकदा तू भेट ना
क्षण बावरे हसती पुन्हा
बस एकदा तू भेट ना



Credits
Writer(s): Kshitij Patwardhan, Troydin G Gomes, Arif Syed
Lyrics powered by www.musixmatch.com

Link