Aaj Dise Ka Chandra Gulabi

आज दिसे का चंद्र गुलाबी?
हवेस येतो गंध शराबी

अष्टमिच्या या अर्ध्या राती
तुझी नि माझी फुलली प्रीती
तुझी नि माझी फुलली प्रीती

अर्धे मिटले, अर्धे उघडे
या नयनातून स्वप्न उलगडे

तळहातावर भाग्य उतरले
हात तुझा रे माझ्या हाती
तुझी नि माझी फुलली प्रीती

स्वप्नी तुझ्या मी येता, राणी
दुनिया झाली स्वप्नी दिवाणी

बघ दोघांचे घरकुल अपुले
निशिगंधाची बाग सभोवती
तुझी नि माझी फुलली प्रीती

अर्धी मिटली, अर्धी उघडी
खिडकी मजसी दिसे तेवढी

अनुरागाच्या मंजुळ ताना, आ
अनुरागाच्या मंजुळ ताना
कर्णफुलासम कानी येती
तुझी नि माझी फुलली प्रीती

या स्वप्नातच जीव भरावा
कैफ असा हा नित्य उरावा

अशीच व्हावी संगमरवरी
अर्धोन्मीलित अपुली नाती
तुझी नि माझी फुलली प्रीती
तुझी नि माझी फुलली प्रीती



Credits
Writer(s): Vasant Pawar, G D Madgulkar
Lyrics powered by www.musixmatch.com

Link