Sai Tujhe Charni Maajhe

साई तुझे चरणी माझे लागलेसे ध्यान
साई तुझे चरणी माझे लागलेसे ध्यान
घेता दर्शन...
घेता दर्शन होई चित्त हे प्रसन्न

साई तुझे चरणी माझे लागलेसे ध्यान
साई तुझे चरणी माझे लागलेसे ध्यान

भक्तगणाचा तूचि बाप-आई
तुझा महिमा गाता-गाता सर्व शीळ जाई
नास्तिक देहाला...
नास्तिक देहाला मिळे समाधान

साई तुझे चरणी माझे लागलेसे ध्यान
साई तुझे चरणी माझे लागलेसे ध्यान

सान लेकरांचे पालन कराया
कृपेची शिरी तू धरी छत्रछाया
मुक्तीपथा नेशी...
मुक्तीपथा नेशी बालक अजाण

साई तुझे चरणी माझे लागलेसे ध्यान
साई तुझे चरणी माझे लागलेसे ध्यान

दुःख दारिद्र्याच्या थांबविशी लाटा
सुख-समृद्धीचा मिळे नित्य वाटा
कृपावंत देवा...
कृपावंत देवा तंव महिमा महान

साई तुझे चरणी माझे लागलेसे ध्यान
साई तुझे चरणी माझे लागलेसे ध्यान

पायघोळ कफनी वस्त्रे जीर्ण पांघरीली
अवनीवरी अनेक रूपे शक्तिदावे येली
येते गुण गाता...
येते गुण गाता भक्तीला उधाण

साई तुझे चरणी माझे लागलेसे ध्यान
साई तुझे चरणी माझे लागलेसे ध्यान
घेता दर्शन...
घेता दर्शन होई चित्त हे प्रसन्न

साई तुझे चरणी माझे लागलेसे ध्यान
साई तुझे चरणी माझे लागलेसे ध्यान
साई तुझे चरणी माझे लागलेसे ध्यान



Credits
Writer(s): Anand Shinde, Damodar Shirwale
Lyrics powered by www.musixmatch.com

Link