Jau De Na Va (From "Naal")

ए...
ए...
ओ... ओ...
ए...
भूर-भूर-भूर
भूर-भूर-भूर
ओ... ओ...
ए...

मध किती गोडं-गोडं-गोडं
झाडावर जु जु झूल
काडीवर मुंगळ्याची Circus, गोल गोल गोल
तोल जाऊन चाक होई, गोल-गोल-गोल-गोल-गोल-गोल-गोल
Tractor वर चक्कर मारायची, दूर दूर दूर
कागदाचं विमान उडतंय, भूर भूर भूर

आई मला खेळायला जायचंय
जाऊ दे न व...
नदीमध्ये पोहायला जायचंय
जाऊ दे न व...
माझा सगळा अभ्यास झालाय
जाऊ दे न व...
(जाऊ दे न व)
मी तुझं सगळं काम ऐकतो
जाऊ दे न व...

भूर-भूर-भूर
भूर-भूर-भूर
भूर-भूर-भूर
भूर-भूर-भूर

रोज सकाळी उठायचं
कोंबडीचं घर उघडायचं
पिल्लुच्या मागे नाचायचं
थुई-थुई-थुई-थुई-थुई
रेडकूचा लोब करायचं
चकाचक आंघोळ करायचं
पटापट शाळेला जायचं
टमटम मध्ये बुई... (बुई...)

वर्गात comics ची मज्जाच लई-लई-लई
कच्या जांबा बोरांची गोडीच लई-लई-लई
साबणाचे रंगीत रंगीत फुग्गे उडवू लई-लई-लई
दगड कि माती खेळायला पोट्टे जमवू लई-लई-लई

ए...
ए...
ए...
ए...

सगळ्यात जास्त लाड माझी आज्जी करते
अंगणात गोष्ट ऐकवत-ऐकवत झोपवते
पण रात्री थंडीत झोप
मोडती न व...
आई मला तुझ्या कुशीतच आवडते
जवळ ये न व...
आई तुझा हात झोपताना
असाच राहू दे न व...
आजवानी उद्या बी खेळायला
जाऊ दे न व...



Credits
Writer(s): Av Prafullachandra
Lyrics powered by www.musixmatch.com

Link