Diksha Bhumila Tya Jaau Chala

तो धम्म सोहळा पाहू चला, धनी पाहू चला
दिक्षा भूमीला त्या जाऊ चला
तो धम्म सोहळा पाहू चला, धनी पाहू चला
दिक्षा भूमीला त्या जाऊ चला

आधी ठरवू प्रवासाचा दिस आपला
भिम धर्मांतराचा जगी दाखला
धम्म-बुद्धाचा ज्याने हा स्वीकारला
आनंद घेऊ सोहळ्यातला, या सोहळ्यातला

सखे नागपूराला नेईल तुला
तो धम्म सोहळा पाहू चला, धनी पाहू चला
दिक्षा भूमीला त्या जाऊ चला

ऑक्टोम्बर 14 ला आठवण ती येई
भिमाच धर्मांतर हो बाई
ऑक्टोम्बर 14 ला आठवण ती येई
भिमाच धर्मांतर हो बाई

शांती दूताला जो आला शरण
मार्ग तो अष्टांगिक स्वीकारला
हा, जाण्यास जीव हा आतुरला, आतुरला

दिक्षा भूमीला त्या जाऊ चला
तो धम्म सोहळा पाहू चला, पाहू चला
दिक्षा भूमीला त्या जाऊ चला

क्रांती नवी एक घडवून गेले
धम्मचक्र हे भिमरायाचे
हो, क्रांती नवी एक घडवून गेले
धम्मचक्र हे भिमरायाचे

भिमाच्या क्रांतीने बघ सोडले
पान नवीन एक इतिहासाचे
समता रुपी हा पथ दाविला, पथ दाविला

दिक्षा भूमीला त्या जाऊ चला
तो धम्म सोहळा पाहू चला, पाहू चला
दिक्षा भूमीला त्या जाऊ चला

आधी ठरवू प्रवासाचा दिस आपला
भिम धर्मांतराचा जगी दाखला
धम्म बुद्धाचा ज्याने हा स्वीकारला

आनंद घेऊ सोहळ्यातला, या सोहळ्यातला
सखे नागपूराला नेईन तुला

तो धम्म सोहळा पाहू चला, पाहू चला
दिक्षा भूमीला त्या जाऊ चला
जाण्यास जीव हा आतुरला, आतुरला
दिक्षा भूमीला त्या जाऊ चला



Credits
Writer(s): Sagar Pawar, Adarsh Shinde
Lyrics powered by www.musixmatch.com

Link