Airanichya Deva Tula

ऐरणिच्या देवा तुला ठिणगी-ठिणगी वाहू दे
आभाळागत माया तुझी आम्हांवरी ऱ्हाऊ दे
आभाळागत माया तुझी आम्हांवरी ऱ्हाऊ दे

लेऊ लेनं गरीबीचं, चनं खाऊ लोकंडाचं
लेऊ लेनं गरीबीचं, चनं खाऊ लोकंडाचं
जीनं व्होवं अबरुचं, धनी मातुर माझा देवा वाघावानी असू दे
आभाळागत माया तुझी आम्हांवरी ऱ्हाऊ दे

लक्ष्मीच्या हतातली चवरी व्हावी वर-खाली
लक्ष्मीच्या हतातली चवरी व्हावी वर-खाली
इडा-पीडा जाई, आली किरपा तुजी भात्यातल्या सुरासंगं
किरपा तुजी भात्यातल्या सुरासंगं गाऊ दे
आभाळागत माया तुझी आम्हांवरी ऱ्हाऊ दे

सुख थोडं, दुःख भारी, दुनिया ही भरी-भुरी
सुख थोडं, दुःख भारी, दुनिया ही भरी-भुरी
घाव बसंल घावावरी, सोसायाला, झुंजायाला अंगी बळं येऊ दे
आभाळागत माया तुझी आम्हांवरी ऱ्हाऊ दे

ऐरणिच्या देवा तुला ठिणगी-ठिणगी वाहू दे
आभाळागत माया तुझी आम्हांवरी ऱ्हाऊ दे



Credits
Lyrics powered by www.musixmatch.com

Link