Ya Pudhe Prabhu Tu Majha

या पुढे प्रभू तू माझा
प्रिय बंधू स्वामीराजा
या पुढे...
तंव सेवा हे मम अन्न
तंव चिंतन हे मम शयन

या पुढे...
तंव नामाचा जयघोष
हा माझा श्वासोश्वास
या पुढे...
ही तृष्टी जगाला विटली
तुझ्यापदी जडली

प्रभू तू माझा, प्रभू तू माझा
प्रिय बंधू स्वामीराजा
या पुढे...

तुजसाठी गृहसुततारा
तुजसाठी सर्व पसारा
या पुढे...
तुजसाठी वसती देही
तुजसाठी दिशा ह्या दाही
या पुढे...

हे सत्वर पिले घेई एवढे देई
प्रभू तू माझा, प्रभू तू माझा
प्रिय बंधू स्वामीराजा
या पुढे...

ममविचार तू ममउक्ती
तू युक्ती, भुकती, मुफ्ती
या पुढे...
मी-तू हा भेदच नूरला
उरला तरी तो दिसण्याला
या पुढे...

मी मुक्तसुखी मी शांत सदा स्वर्गात
प्रभू तू माझा, प्रभू तू माझा
प्रिय बंधू स्वामीराजा
या पुढे...



Credits
Writer(s): Narayan Vaman Tilak
Lyrics powered by www.musixmatch.com

Link