Asawi Ashi Zindagi

हसावी कधी, रुसावी कधी
असावी अशी जिंदगी
कधी एकटी, कधी मैफिली
अशी शायरी जिंदगी

थोडी-थोडीशी ही जगायची, आहे थोडीशी ही
जरी थोडी तरी चाखायची गोडी हिची
हसावी कधी, रुसावी कधी
असावी अशी जिंदगी

कधी हिचे बहाणे थोडे वेडे, शहाणे
आयुष्य हे जसे थोडे तिच्यासारखे
कधी कुणी दिवाने प्रेमात गायी गाणे
आयुष्य हे जसे परिकथेसारखे

कधी थोडी खुशी, कधी थोड्या वेदना
तरी ना थांबता तू धाव घे रे मना

हसावी कधी, रुसावी कधी
असावी अशी जिंदगी
कधी एकटी, कधी मैफिली
अशी शायरी जिंदगी

प्रेमात भुलणारी, हळूच खुलणारी
ही जिंदगी थोडी तरी असावी अशी
दुःखात हसणारी, हसत जगणारी
ही जिंदगी थोडी तरी जगावी अशी

कधीतरी उन्हे, कधीपणे सावली
कधी ना थांबता तू चाल वाटेवरी

कधी साखळी, कधी मोकळी
असावी अशी जिंदगी
कधी एकटी, कधी मैफिली
अशी शायरी जिंदगी



Credits
Writer(s): Sachin Pathak, Samir Saptiskar
Lyrics powered by www.musixmatch.com

Link