Pashanantun Wedya Kan Too

पाषाणातुन वेड्या का तू...
पाषाणातुन वेड्या का तू बघसी रे श्रीराम?
अंतरी आहे आत्माराम
अंतरी आहे आत्माराम

त्या देहाच्या देव्हाऱ्यातून
ज्योती उजळत नयनदळातून
त्या देहाच्या देव्हाऱ्यातून
ज्योती उजळत नयनदळातून

दोन करांची माला वाहून...
दोन करांची माला वाहून कर भक्ती निष्काम
अंतरी आहे आत्माराम
अंतरी आहे आत्माराम

निर्मळ गंगा करून मनाची, आ
निर्मळ गंगा करून मनाची
कावड न्यावी पावित्र्याची

मन कमळावर तुझ्याच आहे...
मन कमळावर तुझ्याच आहे प्रभु जानकी राम
अंतरी आहे आत्माराम
अंतरी आहे आत्माराम

वेदाहून ते पवित्र सुंदर
हृदय असू दे सदा निरंतर
वेदाहून ते पवित्र सुंदर
हृदय असू दे सदा निरंतर

आसवांतही वाट भक्तिची...
आसवांतही वाट भक्तिची त्यातच मेघश्याम
अंतरी आहे आत्माराम
अंतरी आहे आत्माराम

पाषाणातुन वेड्या का तू बघसी रे श्रीराम?
अंतरी आहे आत्माराम
अंतरी आहे आत्माराम



Credits
Writer(s): Vasant Ajgaonkar, Madhukar Joshi
Lyrics powered by www.musixmatch.com

Link