Ekant Bephat Aani Varahi Pisat

एकांत बेफाट, वाराही पिसाट
जातोस जोसात लांब
हा, एकांत बेफाट, वाराही पिसाट
जातोस जोसात लांब
अरे, अरे, अरे, अरे थांब, हो जरा थांब

हो, इश्काच्या घाटात फिरुया झोकात
मस्तीत नाचूया छम, छम, छम
इश्काच्या रंगात, भलत्याच ढंगात
होईन मी गं जाम
इश्काच्या रंगात, भलत्याच ढंगात
होईन मी गं जाम

अगं, अगं, अगं, अगं थांब, ए जरा थांब
डोळ्यात शृंगार, अंगात अंगार
रूपाचा केवडा घम, घम, घम
भरात आलाय माझा मळा
अरे, भरात आलाय माझा मळा
भल्या-भल्यांना लागे लळा
आहे गं मी तर साधा-भोळा

कशाला धरतेस माझा गळा?
गळ्यात हा, प्रीतीची बात
कानात सांगते थांब, थांब, थांब

हा, इश्काच्या रंगात, भलत्याच ढंगात
होईन मी गं जाम

अगं, अगं, अगं, अगं थांब, ए जरा थांब
डोळ्यात शृंगार, अंगात अंगार
रूपाचा केवडा घम, घम, घम

हो, एकांत बेफाट, वाराही पिसाट
जातोस जोसात लांब
अरे, अरे, अरे, अरे थांब, हो जरा थांब
हो, इश्काच्या घाटात फिरुया झोकात
मस्तीत नाचूया छम, छम, छम
उरात गुदगुद काहीतरी
उरात गुदगुद काहीतरी
विजेची झणझण अंगावरी
प्रेमाच्या उबेत जादूगिरी
मिठीच्या मधात गोडी खरी

पिरतीचा खेळ (हे) पहिलाच वेळ
मलाच फुटतोय घाम, घाम, घाम

एकांत बेफाट, वाराही पिसाट
जातोस जोसात लांब
अरे, अरे, अरे, अरे थांब, हो जरा थांब
हो, इश्काच्या घाटात फिरुया झोकात
मस्तीत नाचूया छम, छम, छम

हा, इश्काच्या रंगात, भलत्याच ढंगात
होईन मी गं जाम
अगं, अगं, अगं, अगं थांब, ए जरा थांब
डोळ्यात शृंगार, अंगात अंगार
रूपाचा केवडा घम, घम, घम



Credits
Writer(s): Suresh Kumar, Murlidhar Gode
Lyrics powered by www.musixmatch.com

Link