Dayaghana Re Hi Yachana Re

दयाघना, ही याचना रे
हाक देतो धावना
दयाघना, ही याचना रे
हाक देतो धावना

दूर व्हावे दैत्य माझे
तू आम्हाला पावना
दूर व्हावे दैत्य माझे
तू आम्हाला पावना
दयाघना...

पार्थ तू अन सार्थ तू रे
या मनाचे आर्त तू
अंत मी रे, तू अनंता
जाणीवेचा संत तू

दोष माझे झाक देवा
दोष माझे झाक देवा
दिव्यदृष्टी लाभता

दूर व्हावे दैत्य माझे
तू आम्हाला पावना
दयाघना...
(दयाघना...)

नष्ट झाले ध्यान, देवा
दृष्ट माझा काळीमा
स्पष्ट झाले मी पशु रे
कष्ट दे माझ्या जिवा

तोडल्या त्या काच भिंती
मोडला मी उंबरा
हाती आला वेदनेचा
हा रिकामा पिंजरा

यातनांचे गाव माझे
तू जगाला सांगना
दयाघना...

दयाघना, ही याचना रे
हाक देतो धावना
दूर व्हावे दैत्य माझे
तू आम्हाला पावना

दूर व्हावे दैत्य माझे
तू आम्हाला पावना
दयाघना...



Credits
Writer(s): Sanjay Krishnaji Patil, Amitraj
Lyrics powered by www.musixmatch.com

Link