Ishqacha Khelu Daav Re

इश्क

काळजात गोंदलेलं तुझं नाव रे
काळजात गोंदलेलं तुझं नाव रे
चल रे सख्या, इश्काचा खेळू डाव रे
चल रे सख्या, इश्काचा खेळू डाव रे

तुझी-माझी लाखामध्ये जोडी भारी गं
तुझी-माझी लाखामध्ये जोडी भारी गं
तुझ्यासाठी झालो, राणी, प्रेम पुजारी गं
तुझ्यासाठी झालो, राणी, प्रेम पुजारी गं

तुझ्या मिठीमध्ये माझी सारी दुनिया
अशी-कशी केली, राजा, सांग किमया?
आरश्यात दिसे मला तुझा चेहरा
तुला बघताचं होई जीव बावरा

दिसतोया मला चांदण्याचा गाव रे
चल रे सख्या, इश्काचा खेळू डाव रे
मजनूच्या मागे आता माझी बारी गं
तुझ्यासाठी झालो राणी प्रेम पुजारी गं

मी तुझी राधा, तू माझा सावळा
चल, दोघे फुलवूया प्रीतीचा मळा
हो, उधळले रंग सारे तुझ्यावर मी
रोज साजरी करू ना रंगपंचमी

चांदण्याच्या गावी निघाली ही नाव रे
चल रे सख्या, इश्काचा खेळू डाव रे
तुझ्या नावे दौलत माझी केली सारी गं
तुझ्यासाठी झालो, राणी, प्रेम पुजारी गं

चल रे सख्या, इश्काचा खेळू डाव रे
तुझ्यासाठी झालो, राणी, प्रेम पुजारी गं
तुझ्यासाठी झालो, राणी, प्रेम पुजारी गं



Credits
Writer(s): Ramesh Roshan, Yogiraj Mane
Lyrics powered by www.musixmatch.com

Link