Tu Zara Zara

तु जरा-जरा जवळ ये ना प्रिये
हात हाती घे धुंद हो ना प्रिये
मी दीवाना आहे तुझा
तु ही दीवानी हो ना जरा प्रिये

तु जरा-जरा जवळ ये ना प्रिये
हात हाती घे धुंद हो ना प्रिये

केस हे मोकळे, धुंदी ही वेगळी
का गं मिटली सांग ना ओठांची पाकळी?
तु जरा वेंधळा, मी जरा बावरी
छेडली तु या मनी भावनांची बासरी

बासुरीचे स्वर हे घुमू दे
या स्वरानी चिंब ओली होना प्रिये
तु जरा-जरा जवळ ये ना प्रिये
हात हाती घे धुंद हो ना प्रिये

भेटीला ओठांच्या का हाताचा पहारा
हे पहारे दूर कर, येवू दे ना शहारा
हा इशारा पाहुनी गेले मी लाजूनी
स्वप्न हे भासते एकांती या क्षणी

या क्षणांना साथ दे ना
भावना या जाणून घे ना प्रिये

तु जरा-जरा जवळ ये ना प्रिये
हात हाती घे धुंद हो ना प्रिये
मी दीवाना आहे तुझा
तु ही दीवानी हो ना जरा प्रिये

तु जरा-जरा जवळ ये ना प्रिये
हात हाती घे धुंद हो ना प्रिये
तु जरा-जरा जवळ ये साजणा
हात हाती घे धुंद हो साजणा
तु जरा-जरा...



Credits
Writer(s): Sainath Patole, Navin Parmar, Sandeep Rokde, Yogesh Kamble
Lyrics powered by www.musixmatch.com

Link