Navkoticha Raja

हे आभाळ ठेंगणे वाटू लागले मला गं
हे आभाळ ठेंगणे वाटू लागले मला गं
पती नवकोटीचा राजा विश्वाचे सुख मला गं
पती नवकोटीचा राजा विश्वाचे सुख मला गं

नको हे सोने-चांदी, नको हिरे अन मोती
पती डोळ्याने पाहता हर्ष ती मम् ज्योती

लाजवील कुबेरा संसार माझा भला गं
लाजवील कुबेरा संसार माझा भला गं
पती नवकोटीचा राजा विश्वाचे सुख मला गं
पती नवकोटीचा राजा विश्वाचे सुख मला गं

बॅरिस्टराच्या पदव्या अलंकार ते माझे
दुबळ्या या संसारी हर्ष बहुत विराजे

दीन-दुबळ्या फुलांचा बहरला हा मळा गं
दीन-दुबळ्या फुलांचा बहरला हा मळा गं
पती नवकोटीचा राजा विश्वाचे सुख मला गं
पती नवकोटीचा राजा विश्वाचे सुख मला गं

त्या चंद्र-सुर्यापरी कपाळी कुंकू माझे
ग्रंथाच्या उतरंडीने घरकुल बाई गं साजे

वैभव राजवाड्यासम आले फळा गं
वैभव राजवाड्यासम आले फळा गं
पती नवकोटीचा राजा विश्वाचे सुख मला गं
पती नवकोटीचा राजा विश्वाचे सुख मला गं

कोटी दीनांची आई भाग्य हे माझे थोर
दुबळ्या या लेकरांना देई मायेचा पाझर

वारसा या कुळाचा अशोकाला त्या दिला गं
वारसा या कुळाचा अशोकाला त्या दिला गं
पती नवकोटीचा राजा विश्वाचे सुख मला गं
पती नवकोटीचा राजा विश्वाचे सुख मला गं

हे आभाळ ठेंगणे वाटू लागले मला गं
हे आभाळ ठेंगणे वाटू लागले मला गं
पती नवकोटीचा राजा विश्वाचे सुख मला गं
पती नवकोटीचा राजा विश्वाचे सुख मला गं

पती नवकोटीचा राजा विश्वाचे सुख मला गं
पती नवकोटीचा राजा विश्वाचे सुख मला गं
पती नवकोटीचा राजा विश्वाचे सुख मला गं



Credits
Writer(s): Prabhakar Pokhrikar, Prahlad Shinde
Lyrics powered by www.musixmatch.com

Link