Gori Gori Mi Aabhalatli Pari

गोरी, गोरी, गोरी मी अभाळातली परी
गोरी, गोरी, गोरी मी अभाळातली परी
माझ्या अंगाचा...
Hey, माझ्या अंगाचा रंग करी चमचम, चमचम, चम
अंगाचा रंग करी चमचम

(आज हवा गुलाबी गरम-गरम)
(हिची नाजूक तबियत नरम-नरम)
(कशी ल्यालीया चोळी चलम-तलम)
(माझी बाई, सखे गं, माझी बाई गं) हो

लाडी-लाडीनं का नुसतंच बोलू, जा की
आधी मला आणा चंदेरी शालू

हो, घाई-घाई नेसून, गालामंदी हसून
घाई-घाई नेसून, गालामंदी हसून
तुम्हा म्होरं नाचीन, हो
तुम्हा म्होरं नाचीन छम-छम-छम, छम-छम-छम

हो, माझ्या अंगाचा...
Hey, माझ्या अंगाचा रंग करी चमचम, चमचम, चम
अंगाचा रंग करी चमचम

(आज हवा गुलाबी गरम-गरम)
(हिची नाजूक तबियत नरम-नरम)
(कशी ल्यालीया चोळी चलम-तलम)
(माझी बाई, सखे गं, माझी बाई गं) हो

लाडी-लाडी अशी करू नका थट्टा
आणा मला आधी कंबरी पट्टा

ए, शेजवर सजून, लाजमंदी भिजून
शेजवर सजून, लाजमंदी भिजून
अत्तर मी शिपडीन, हो
अत्तर मी शिपडीन घम-घम-घम, घम-घम-घम

हो, माझ्या अंगाचा...
माझ्या अंगाचा रंग करी चमचम, चमचम, चम
अंगाचा रंग करी चमचम

(आज हवा गुलाबी गरम-गरम)
(हिची नाजूक तबियत नरम-नरम)
(कशी ल्यालीया चोळी चलम-तलम)
(माझी बाई, सखे गं, माझी बाई गं) हो

लाडी-लाडी मला भुलवाल कशी, कशी?
सांगा कशी करू तुमची मी खुशी?

हो, थोडं-थोडं लांबून, थोडं-थोडं थांबून
थोडं-थोडं लांबून, थोडं-थोडं थांबून
पेला देते भरून, हो
पेला देते भरून दम धरा दम, दम धरा दम

हो, माझ्या अंगाचा...
माझ्या अंगाचा रंग करी चमचम, चमचम, चम
अंगाचा रंग करी चमचम, चमचम, चम



Credits
Writer(s): Traditional, Bhushan Dua
Lyrics powered by www.musixmatch.com

Link