Mukya Ya Kalila

मुक्या या कळीला तुझा स्पर्श झाला
मुक्या या कळीला तुझा स्पर्श झाला
ऋतू यौवणाचा सुगंधात न्हाला
ऋतू यौवणाचा...

तुझ्या पौरुष्याचा मला मोह वाटे
मिठी दाटवावी, खुपावेत काटे
नवी जाण आली खुळ्या या वयाला

मुक्या या कळीला तुझा स्पर्श झाला
मुक्या या कळीला...

जरी बोललो मी कुणा शब्द काही
खरे काय ठावे तुला ही, मला ही
कसा रंग आला मनोमिलनाला

ऋतू यौवणाचा सुगंधात न्हाला
ऋतू यौवणाचा...

कुणाचा, कशाचा आता बंध नाही
खुल्या-मोकळ्या या दिशा आज दाही
तुझा हात हाती जणू स्वर्ग आला

ऋतू यौवणाचा सुगंधात न्हाला
ऋतू यौवणाचा सुगंधात न्हाला
ऋतू यौवणाचा...



Credits
Writer(s): Shanta Shelke, Sudhir Fadke
Lyrics powered by www.musixmatch.com

Link