Kalokhachya Watevarati

काळोखाचा वाटेवरती उजेड रुसला बाई
कशी मी हरले? कुठे न उरले दिशा पेटल्या दाही
—दिशा पेटल्या दाही

काळोखाचा वाटेवरती उजेड रुसला बाई
कशी मी हरले? कुठे न उरले दिशा पेटल्या दाही
—दिशा पेटल्या दाही

ऐल तटावर, पैल पटावर असुरांच्या रेषा
उरात गाणे सुरात रडते निमूट झाली भाषा
ऐल तटावर, पैल पटावर असुरांच्या रेषा
उरात गाणे सुरात रडते निमूट झाली भाषा

हो, जमीन करपली झाली भरती आभाळाची लाही
कशी मी हरले? कुठे न उरले दिशा पेटल्या दाही
हो, जमीन करपली झाली भरती आभाळाची लाही
कशी मी हरले? कुठे न उरले दिशा पेटल्या दाही

काळोखाचा वाटेवरी उजेड रुसला बाई

कुठ डावं, कुठ रडावं अंधाराच्या दारी
कुठ दडावं, मनी कुढावं भुवंडते भारी

रानात पाऊल फिरते चाहूल
कालिज फाटलं जनामधे वाटलं
जीव हरपतो थरकतो असा जळतो बाई

हो, जमीन करपली झाली भरती आभाळाची लाही
कशी मी हरले? कुठे न उरले दिशा पेटल्या दाही
हो, जमीन करपली झाली भरती आभाळाची लाही
कशी मी हरले? कुठे न उरले दिशा पेटल्या दाही

काळोखाचा वाटेवरती उजेड रुसला बाई
कशी मी हरले? कुठे न उरले दिशा पेटल्या दाही

Credits
Writer(s): Sanjay Krishnaji Patil, Amitraj
Lyrics powered by www.musixmatch.com

Link