Haluvar Haak Tu

हळुवार हाक तू, पापणीची जाग तू
उसवून नाते असे जाऊ नको दूर
उरातली ओढ तू, मनातले वेड तू
आठवणी तुझ्या देती नवी हुरहूर

ना कुणीही तुझ्यासारखे, का मनाला सारे पोरके?
अवती-भवती रिते-रिते जग हे

हळुवार हाक तू, पापणीची जाग तू
उसवून नाते असे जाऊ नको दूर
उरातली ओढ तू, मनातले वेड तू
आठवणी तुझ्या देती नवी हुरहूर

झाडे, वेली, पाने, मुक्या आबोलीचे गाणे
तुला आभाळ घे माझे सारे निळे-निळे
काळजीची भेट दिली देवाजीने थेट
झाले घरदार सुखी सारे तुझ्यामुळे

कळे नाही कोणती झाली चूक नेमकी
पदरात कशापायी दान हे मिळे?
कशी साथ सावली सोडूनी का दावली
गोंजारीत आठवणी जीव हा झुरे

ना कुणीही तुझ्यासारखे, का मनाला सारे पोरके?
अवती-भवती रिते-रिते जग हे

हळुवार हाक तू, पापणीची जाग तू
उसवून नाते असे जाऊ नको दूर
उरातली ओढ तू, मनातले वेड तू
आठवणी तुझ्या देती नवी हुरहूर

दाखवीत चांद कोण भरवील घास?
भास उरतील माझ्यापरी मुके
दुरावेल हसू, रोज धावतील आसू
सांग, शोधू तुला दिन-रात मी कुठे?

सुखाचे रे नाव तू, ओळखीचे गाव तू
नकळत जाई वाट तुझ्याकडे
उजेडाचे रोप तू, चांदण्याचा गोप तू
उजळून जाई जग सुने-सुने

ना कुणीही तुझ्यासारखे, का मनाला सारे पोरके?
अवती-भवती रिते-रिते जग हे

हळुवार हाक तू, पापणीची जाग तू
उसवून नाते असे जाऊ नको दूर
उरातली ओढ तू, मनातले वेड तू
आठवणी तुझ्या देती नवी हुरहूर



Credits
Writer(s): Mangesh Balkrishna Kangane, Rohan Rohan
Lyrics powered by www.musixmatch.com

Link