Sajana Re

बांधते मन हळव्या गाठी
गुंतते जरी नसते हाती
कधी कसे सूर जुळती आणि
भावते मग कुठले कोणी

हरवले जग नकळत सारे
हवेहवेसे कुणीतरी वाटे
सांगना जीव झुरतो का रे?
साजना रे, साजना रे
साजना रे, साजना रे

बांधते मन हळव्या गाठी
गुंतते जरी नसते हाती
कधी कसे सूर जुळती आणि
भावते मग कुठले कोणी

हरवले जग नकळत सारे
हवेहवेसे कुणीतरी वाटे
सांगना जीव झुरतो का रे?
साजना रे, साजना रे
साजना रे, साजना रे

हा गंध आहे तुझा, की छंद लागे तुझा
धुंदावलेल्या स्पंदनांना
भांबावले मी कधी, समजावले मी कधी
नादावलेल्या पावलांना

ऐकुनी साद तू येशील का?
साथ जन्मांची देशील का?
हात हाती घेऊनी माझा
रंग स्वप्नांना देशील का?

अनोळखी जग अवघे होते
उमलुनी मन हळवे गाते
सांगना जीव झुरतो का रे?
साजना रे, साजना रे
साजना रे, साजना रे

कळले मला ना कधी, होऊन गेले तुझी
स्वप्नी तुझे मी रंगल्याले
एकांत माझा-तुझा का सांग झाला मुका?
का भावनांना पंख आले?

हो, स्पर्श का रोमांचित झाले?
श्वासही गंधाळून गेले
खेळ हा रात्रंदिन चाले
सारखा भासांचा का रे?

बहरले जरी तन-मन सारे
लागली तरी हुरहूर का रे?
सांगना जीव झुरतो का रे?
साजना रे, साजना रे
साजना रे, साजना रे



Credits
Writer(s): Guru Thakur, Vijay Narayan Govande
Lyrics powered by www.musixmatch.com

Link