Man Majhe

मन माझे हरवले कुठे हे ना कळे
क्षण सारे पलटले कसे हे ना कळे
मन माझे हरवले कुठे हे ना कळे
क्षण सारे पलटले कसे हे ना कळे

Glass भरला का रिता
ही अशी ही का व्यथा?
कुणा सांगू मी कशी गं ही कथा?
कोण आहे याचा करविता?

ताल मी, तु सूर होऊनी
गीत मी, तु अर्थ होऊनी
उडावे हंस होऊनी पंख मुक्त व्हावे जरा
तुटावे बंध होऊनी धुंद व्यक्त व्हावे जरा
कोणी द्यावे हात हाती जरा
मन माझे हरवले कुठे हे ना कळे

फसलो केली जादूगिरी कुणी अशी ही कळेना
भास जो धुक्यापरी दिसे खुळा कसा तो कळेना
हूर वाटे जीवा, तुटतो का दुवा?
हसण्याचा हा बहाणा आहे नवा

हर्ष मी, तु स्पर्श होऊनी
देह मी, तु श्वास होऊनी
जरासे मंद, जरा बेधुंद रात्र व्हावे जरा
लुटावे रंग जरा, स्वच्छंद चित्र व्हावे जरा
ये ना जवळी प्रीतीच्या पाखरा
मन माझे हरवले कुठे हे ना कळे

उरला नाही आता माझ्यावरी माझा ही भरोसा
करू मी सांग कशा आता याचा खुलासा?
ओढ़ आहे जुनी, का नव्याने म्हनी
फसुण्याचा हा नशा आहे नवा

संग तु, मी दंग होऊनी
स्वर्य तु, मी बंध तोडूनी
पुसावे आज होनी का लाजू येत आहे जरा?
दिसावे खास करूनी साज मोहरावे जरा
केशात माझ्या माळ ना मोगरा

मन माझे हरवले कुठे हे ना कळे
क्षण सारे पलटले कसे हे ना कळे

Glass भरला का रिता
ही अशी ही का व्यथा?
कुणा सांगू मी कशी गं ही कथा?
कोण आहे याचा करविता?



Credits
Writer(s): Akhil Ramesh Joshi, Abhijeet Prakash Narvekar
Lyrics powered by www.musixmatch.com

Link