Pinplachya Paanawar

पिंपळाच्या पानावर पाहीले चित्र गौतमाचे
पिंपळाच्या पानावर पाहीले चित्र गौतमाचे
बोधिवृक्षाने कथन केले ते चारित्र्य गौतमाचे
पिंपळाच्या पानावर पाहीले चित्र गौतमाचे
पिंपळाच्या पानावर पाहीले चित्र गौतमाचे

किती घोर तपस्या ती देहाचे वारूळ झाले
बुद्धगया, अजंठा ही साक्षात वेरूळ आले

अष्टगाथा मंगलमय ते पावित्र्य गौतमाचे
पिंपळाच्या पानावर पाहीले चित्र गौतमाचे
पिंपळाच्या पानावर पाहीले चित्र गौतमाचे

या सावलीत माझ्या विश्वाची माऊली ती
ह्रदयात मानवाच्या धम्मज्योत लाविली ती

जग जिंकूनी झाले ते मित्र गौतमाचे
पिंपळाच्या पानावर पाहीले चित्र गौतमाचे
पिंपळाच्या पानावर पाहीले चित्र गौतमाचे

कधी केला नाही गर्व, ना वाद कधी केला
तरी देश आज म्हणतो, "मी बुद्धाचा चेला"

बुद्धाने बुद्ध पाहे सचित्र गौतमाचे
पिंपळाच्या पानावर पाहीले चित्र गौतमाचे
पिंपळाच्या पानावर पाहीले चित्र गौतमाचे

लिहिले कुठेच नाही हा माझा धम्म आहे
निर्वाण पदानंतर या जगी स्तुप आहे

भिमदुतास कळले ते सन्मित्र गौतमाचे
पिंपळाच्या पानावर पाहीले चित्र गौतमाचे
पिंपळाच्या पानावर पाहीले चित्र गौतमाचे

बोधिवृक्षाने कथन केले ते चारित्र्य गौतमाचे
पिंपळाच्या पानावर पाहीले चित्र गौतमाचे
पिंपळाच्या पानावर पाहीले चित्र गौतमाचे



Credits
Writer(s): Madhukar Pathak, Anand Shinde, Harshad Shinde, Rajas Jadhav
Lyrics powered by www.musixmatch.com

Link