Shwaas De

श्वास दे स्वप्नास या
विश्वास दे जगण्यास या
श्वास दे स्वप्नास या
विश्वास दे जगण्यास या

ये रंगवू अंधार हा
दे अर्थ तू हसण्यास या
तू झेप घे आभाळ हे सारे तुझे
तू घे पुन्हा जिंकून हे तारे तुझे

Hmm, हसता-हसता आले हसू
खेळू लागले जसे ऊन सावल्यांशी
बघता-बघता झाली जादू
बोलू लागली जशी वाट पावलांची

तू झेप घे आभाळ हे सारे तुझे
तू घे पुन्हा जिंकून हे तारे तुझे

तुला तुझे सापडले नाव कालचे
खुणावती तुला पुन्हा रंग बोलके
पापणीला पुन्हा नवे स्वप्न थांबले

विरले जरी, धागे तरी
जग राहिले मागे जरी
गाणे नवे ओठांवरी यावे पुन्हा



Credits
Writer(s): Rohan Gokhale, Rohan Anil Pradhan, Mandar Shashikant Cholkar
Lyrics powered by www.musixmatch.com

Link