Geeta Nirupan

कर्मण्येवाधिकारस्ते, मा फलेषु कदाचन
मा कर्मफलहेतुर्भूर्मा, ते सङ्गोऽस्त्वकर्मणि

कर्म करणे हेच तुझे ध्येय
त्याच्या फळाची अपेक्षा बाळगण्याचा, तुला अधिकार नाही
कर्मातुन काय मिळणार, याचा विचार तु मनात आणू नकोस
तसस कर्म न आचरण्याचेही, तु ठरवू नकोस

नयिद्ञानेन् सद्रुश्यम् पवित्रम्यह विंध्यति
तत्स्वै योगसंसिद्ध कालेनात्मनी विंध्यति

ज्ञानासारख पवित्र दुसरे काहीही नाही
ज्याने कर्मयोग आत्मसात केलाय, त्याला ज्ञान आपोआपच प्राप्त होत

परित्राणाय साधूनां, विनाशाय च दुष्कृतं
धर्म संस्थापनार्थाय, संभवामि युगे युगे

सज्जनांचे संरक्षण करण्यासाठी
आणि दुष्टांचा संहार करण्यासाठी
धर्माची पुन्हा स्थापना करण्यासाठी
वेळोवेळी मी जन्म घेतो
अस श्रीकृष्ण म्हणतात

वासांसि जीर्णानि यथा विहाय, नवानि गृह्णाति नरोऽपराणि
यथा शरीराणि विहाय जीर्णान्यन्यानि संयाति नवानि देही

माणूस, ज्याप्रमाणे कपडे जुने झाले की ते टाकुन नवे कपडे घालतो
त्याचप्रमाणे आत्मासुद्धा जीर्ण झालेले शरीर टाकुन, नव्या शरीरात प्रवेश करतो
यातुन काय बोध घ्यायचा
कि शरीराचा मोह ठेवू नये, आणि त्याचे फार चोचलेही पुरवु नयेत
म्हणजेच, आत्मा, हा शरीरापेक्षा श्रेष्ठ आहे

यदा यदा हि धर्मस्य, ग्लानिर्भवति भारत
अभ्युत्थानमधर्मस्य, तदात्मानं सृजाम्यहम्

जेव्हा जेव्हा जगात धर्माचा म्हणजेच सदाचाराचा नाश व्हायला
न्या अधर्माचे राज्य वाढू लागता
तेव्हा तेव्हा मी पृथ्वीवर अवतरतो
असे भगवान श्रीकृष्ण सांगतात
आणि तेव्हा तेव्हा आपण पृथ्वीवर अवतार घेवुन काय कार्य करायचे, तेही श्रीकृष्ण स्पष्ट करतात



Credits
Writer(s): Sameer Anjaan, Din Mohomed
Lyrics powered by www.musixmatch.com

Link