Sukhakarta Dukhahrta Aarti - Studio

सुखकर्ता, दुखहर्ता, वार्ता विघ्नाची
नुरवी पुरवी प्रेम कृपा जयाची
सर्वांगी सुंदर उटी शेंदुराची
कंठी झळके माळ मुक्ताफळांची

जय देव, जय देव, जय मंगलमूर्ती
दर्शनमात्रे मन कामनांपुरती, जय देव, जय देव

रत्नखचित फरा तूज गौरीकुमरा
चंदनाची उटी कुंकुमकेशरा
हीरे जड़ित मुकुट शोभतो बरा
रुणझुणती नूपुरे चरणी घागरीया

जय देव, जय देव, जय मंगलमूर्ती
दर्शनमात्रे मन कामनांपुरती, जय देव, जय देव

लंबोदर पीतांबर फणीवर वंदना
सरळ सोंड वक्रतुण्ड त्रिनयना
दास रामाचा वाट पाहे सदना
संकटी पावावे, निर्वाणी रक्षावे
सुरवर वंदना, जय देव, जय देव

जय देव, जय देव, जय मंगलमूर्ती
दर्शनमात्रे मन कामनांपुरती, जय देव, जय देव



Credits
Writer(s): Kedar Pandit
Lyrics powered by www.musixmatch.com

Link