Wedyancha Ghar Unnhat

आकाशाच्या छत्रीखाली...
आकाशाच्या छत्रीखाली गाणं गात-गात
तुझ्या-माझ्या, माझ्या-तुझ्या वेड्यांचं घर उन्हात

पाऊस-पाण्याची छत्रीला भीति काय
तुझं-माझं नातं दुधावर साय
पाऊस-पाण्याची छत्रीला भीति काय
तुझं-माझं नातं दुधावर साय

आकाशाच्या छत्रीखाली गाणं गात-गात
तुझ्या-माझ्या, माझ्या-तुझ्या वेड्यांचं घर उन्हात

ऊन असो, वारा असो उरली आता चिंता ना कशाची
तुझी मिळता सोबत बदलू सारी ही कहाणी जगण्याची

वेगळी वाट ही अबोल जरी साथ
चार पावलात दिवस-रात
वेगळी वाट ही अबोल जरी साथ
चार पावलात दिवस-रात

आकाशाच्या छत्रीखाली गाणं गात-गात
तुझ्या-माझ्या, माझ्या-तुझ्या वेड्यांचं घर उन्हात

नातं असं गोड जसं दुधात साखर थोड़ी मायेची
बंध कसा हा गहिरा आपल्यालाच ज्याची ही गोडी

बाकीच्या कुणाला कळणार नाही बात
जगा परे अशी आपुली साथ
बाकीच्या कुणाला कळणार नाही बात
जगा परे अशी आपुली साथ
(आपुली साथ, आपुली साथ)

हो, आकाशाच्या छत्रीखाली गाणं गात-गात
तुझ्या-माझ्या, माझ्या-तुझ्या वेड्यांचं घर उन्हात



Credits
Writer(s): Ajay Singha, Omkar Mangesh Dutt
Lyrics powered by www.musixmatch.com

Link