Angai

अनंत गातो अंगाई, तोच तुझी रे आई
हसता-हसता तू रडायचे नाही
रडविणे हा दुनियेचा चाळा, झोप माझ्या बाळा
अनंत गातो अंगाई, तोच तुझी रे आई

जिच्या हातात पाळण्याची दोरी, तीही नसे समोरी
तुझेच तू स्वप्न बघ सुखाचे, वळण वाकडे जगाचे
आहेच तुझ्या पाठीशी, तू खेळ रे देवाशी

निजता-निजता तू उठायचे नाही
उठविणे हा पाळण्याचा चाळा, झोप माझ्या बाळा
अनंत गातो अंगाई, तोच तुझी रे आई

हो, दैव खेळते, खेळविते जीवाला, खेळव तुच दैवाला
पाय तुझे पाळण्यातच दिसले, देव मनातच हसले
नाही कशाची चिंता रे, माझ्या रे रमता

रमता-रमता तू हरायचे नाही
हरविणे हा खेळण्याचा चाळा, झोप माझ्या बाळा
अनंत गातो अंगाई, तोच तुझी रे आई

हसता-हसता तू रडायचे नाही
रडविणे हा दुनियेचा चाळा...
अनंत गातो अंगाई...
ला-ला-ला, ला-ला-ला



Credits
Writer(s): Kanak Raj, F M Shinde
Lyrics powered by www.musixmatch.com

Link