Rahile Door Ghar

भिर-भिर फिरते
पान दिशातून वाऱ्यावर हुंदके
भिर-भिर फिरते
पान दिशातून वाऱ्यावर हुंदके

मनातले घर आपले जिवलग
सुखास का पारके

राहिले दूर घर पोरके
राहिले दूर घर पोरके
राहिले दूर घर पोरके
राहिले दूर घर पोरके

उब उरीची विणूनी कोवळी
जपली पिले ही घरट्यामधली
पंख पसरता कुठे उडाली?
आकाशाची दूर सावली

मुकीच माया या झाडाची
अश्रूपरी बोलकी

राहिले दूर घर पोरके
राहिले दूर घर पोरके
राहिले दूर घर पोरके
राहिले दूर घर पोरके

मृगजळ शोधीत इथवर आलो
स्वप्नामधुनी कसे जागलो?
वळणावर पण आज थांबलो
त्या घरट्याला कसे विसरलो?

मायेवाचूनी त्या घरट्याच्या
सुख सारे हो फिके

राहिले दूर घर पोरके
राहिले दूर घर पोरके
राहिले दूर घर पोरके
राहिले दूर घर पोरके

माहेराची प्रेम सावली
असता जवळी नाही कळली
हृदयामधुनी सदैव जपली
बघता-बघता नाती तुटली

नात्याची ही वेल कोवळी
बहरातून ही सुके

राहिले दूर घर पोरके
राहिले दूर घर पोरके
राहिले दूर घर पोरके
राहिले दूर घर पोरके



Credits
Writer(s): Atul Gogavale, Ajay Gogavale, Pravin Davane
Lyrics powered by www.musixmatch.com

Link