Aikavi Watate (Male)

तू अंबरात ही भासापरी
तू अंतरात ही श्वासापरी
मौनात स्वर तुझा रेंगाळतो
एकांत तुझ्यासवे झंकारतो

ऐकावी वाटते स्पर्शातली
कविता पुन्हा-पुन्हा
ऐकावी वाटते स्पर्शातली
कविता पुन्हा-पुन्हा

चाहूल तुझी बहराची
हिरव्या ऋतुची, सर पावसाची
कधी तू धग चांदण्याची
एका क्षणाची तरीही युगांची

प्राजक्त फिरतो जसा
सहवास तुझा हा तसा
शब्दात सांगता न ये
हा क्षण दरवळे असा

ऐकावी वाटते स्पर्शातली
कविता पुन्हा-पुन्हा
ऐकावी वाटते स्पर्शातली
कविता पुन्हा-पुन्हा

बेधुंद आसमंत सारा
बेभान वारा, गहिरा इशारा
एकाच लाटेसाठी जणू
आतुर झाला अवघा किनारा

कितीही भेटलो तरी
भेटावे वाटते पुन्हा
अशी का ओढ लागते?
का होते असे सांगना?

ऐकावी वाटते स्पर्शातली
कविता पुन्हा-पुन्हा
ऐकावी वाटते स्पर्शातली
कविता पुन्हा-पुन्हा



Credits
Lyrics powered by www.musixmatch.com

Link