Tuch Maajhi Aai Devaa

तुच माझी आई देवा, तुच माझा बाप
तुच माझी आई देवा, तुच माझा बाप
गोड मानुनी घे सेवा, पोटी घाल पाप
गोड मानुनी घे सेवा, पोटी घाल पाप

चुकलेल्या कोकराया वाट दाखवाया
घ्यावा पुन्हा अवतार बाप्पा मोरया

गणाधीशा, भालचंद्रा, गजवक्रा, गणराया
वक्रतुंडा, धुम्रवर्णा, गणपती बाप्पा मोरया
गणाधीशा, भालचंद्रा, गजवक्रा, गणराया
वक्रतुंडा, धुम्रवर्णा, गणपती बाप्पा मोरया

काय वाहू चरणी तुझ्या? माझे असे काय?
माझा श्वास ही तुझीच माया, तुझे हात पाय
काय वाहू चरणी तुझ्या? माझे असे काय?
माझा श्वास ही तुझीच माया, तुझे हात पाय

कधी घडविसी पापे हातून, कधी घडविसी पुण्य
का खेळीसी खेळ असा हा सारे अगम्य
तारू माझे पैलतीरी तार कराया

गणाधीशा, भालचंद्रा, गजवक्रा, गणराया
वक्रतुंडा, धुम्रवर्णा, गणपती बाप्पा मोरया
गणाधीशा, भालचंद्रा, गजवक्रा, गणराया
वक्रतुंडा, धुम्रवर्णा, गणपती बाप्पा मोरया

हो, ठाई-ठाई रूपे तुझी, चराचरी तुच
कधी होसी सखा, कधी वैरी होसी तुच
ठाई-ठाई रूपे तुझी, चराचरी तुच
कधी होसी सखा, कधी वैरी होसी तुच

देवा तुला देवपण देती भक्तगण
दानवांना पापकर्म शिकवितो कोण?
निजलेल्या पाखरांना सूर्य दाखवाया

गणाधीशा, भालचंद्रा, गजवक्रा, गणराया
वक्रतुंडा, धुम्रवर्णा, गणपती बाप्पा मोरया
गणाधीशा, भालचंद्रा, गजवक्रा, गणराया
वक्रतुंडा, धुम्रवर्णा, गणपती बाप्पा मोरया

Credits
Writer(s): Avadhoot Gupte
Lyrics powered by www.musixmatch.com

Link