Durachya Ranat

दूरच्या रानात, केळीच्या बनात

दूरच्या रानात, केळीच्या बनात
दूरच्या रानात, केळीच्या बनात
हळदिवे ऊन्ह गर्द, हळदिवे ऊन्ह गर्द
पिवळ्या, पिवळ्या, पिवळ्या पानात

दूरच्या रानात, केळीच्या बनात
दूरच्या रानात, केळीच्या बनात

झिळमिळ झाडांच्या झावळ्या दाटीत
झिळमिळ झाडांच्या झावळ्या दाटीत
(झिळमिळ झाडांच्या झावळ्या दाटीत)
पांदीतली पायवाट, पांदीतली पायवाट
पांगली, पांगली पाण्यात

दूरच्या रानात, केळीच्या बनात
दूरच्या रानात, केळीच्या बनात

झुलत्या फांदीच्या सावुल्या पाण्यात
झुलत्या फांदीच्या सावुल्या पाण्यात
(झुलत्या फांदीच्या सावुल्या पाण्यात)
काचबिंदी नभ उभं, काचबिंदी नभ उभं
सांडलं, सांडलं गाण्यात

दूरच्या रानात, केळीच्या बनात
दूरच्या रानात, केळीच्या बनात

लखलख उन्हाची थरथर अंगाला
लखलख उन्हाची थरथर अंगाला
(लखलख उन्हाची थरथर अंगाला)
हरवल्या पावलांची कावीळ रानाला

दूरच्या रानाला, लागीरं उन्हाला
दूरच्या रानाला, लागीरं उन्हाला
पारंबीचा झुला गेला, पारंबीचा झुला गेला
झुलत, झुलत, झुलत नभाला

दूरच्या रानाला, लागीरं उन्हाला
दूरच्या रानाला, लागीरं उन्हाला
Hmm, लागीरं उन्हाला
दूरच्या रानाला, hmm



Credits
Writer(s): Harsshit Abhiraj, Na.dho.mahanor
Lyrics powered by www.musixmatch.com

Link