Ye Na Zara

आज का मला नवे नवेसे भासते
स्वप्न कालचे हवे हवेसे वाटते
तीच धून, तीच खूण, त्याच त्या दिशा
सारे रोजचे तरीही न्यारे वाटते

समजे ना काही माझे मला
तुझ्या रे विना भान नाही जरा

येना जरा बोलना, काहीतरी सांगना
चाहूल या मनाची ऐकना
येना जरा बोलना, काहीतरी सांगना
चाहूल या मनाची ऐकना

हो, ओठावरी वेणू जशी तू दवाचे थेंब लाजरे
अवनी गं तू,भोळी तशी, मी नभाचे वेड हे खुळे
प्रेम आपले खरे की भास सांग रे?
एक आहे रंग संग, धुंद भाव रे

समजे ना काही माझे मला
तुझ्या रे विना भान नाही जरा

येना जरा बोलना, काहीतरी सांगना
चाहूल या मनाची ऐकना
येना जरा बोलना, काहीतरी सांगना
चाहूल या मनाची ऐकना

नकळत का मी उगाच लाजते
सावलीत मी तुझ्याच राहते
नकळत का मी उगाच लाजते
सावलीत मी तुझ्याच राहते

या नभीचे रंग हे, वाऱ्यावरी गंध हे
तुझ्यासाठी आज सारे मागते

येना जरा बोलना, काहीतरी सांगना
चाहूल या मनाची ऐकना
येना जरा बोलना, काहीतरी सांगना
चाहूल या मनाची ऐकना



Credits
Writer(s): Shubhankar Shubhankar, Rahul Deshpande
Lyrics powered by www.musixmatch.com

Link