Gananayaka Female - Studio

गणनायका, शुभदायका, मोरेश्वरा बा तू
लंबोदरा, विघ्नेश्वरा, गणदैवता रे तू
ओंकारा, गणराजा, हे मोरया तू
सुखकर्ता, दुखहर्ता माझ्या मनाचा तू

गणनायका देवा, शुभदायका, मोरेश्वरा बा तू
लंबोदरा, विघ्नेश्वरा, गणदैवता रे तू
(जय गणेशा, श्रीगणेशा)

विघ्नविनायक माझा प्रथमेशा वंदन तुला
अंत न त्याचा कधीही, प्रारंभी जो पूजी तुला
गजवदना तू मंगलदायक, मोरया सिद्धिविनायक
गजवदना तू मंगलदायक, मोरया सिद्धिविनायक
विनायक, विनायक

नमस्कार माझा चरणी तुझ्या मानून घ्यावा तू
गणनायका, शुभदायका, मोरेश्वरा बा तू
लंबोदरा, विघ्नेश्वरा, गणदैवता रे तू
(जय गणेशा, श्रीगणेशा)

श्रीगणनाथा गणेशा तू वसशी दाही दिशा
तेजाळ ती दिपमाला उजळून जाई साऱ्या निशा
तंव चरणांचा मी अंकित, देवाधिदेव तू एकदंत
तंव चरणांचा मी अंकित, देवाधिदेव तू एकदंत
एकदंत, एकदंत

तू स्वामी सकलांचा श्रीविघ्नहारा तू
गणनायका, शुभदायका, मोरेश्वरा बा तू
लंबोदरा, विघ्नेश्वरा, गणदैवता रे तू
ओंकारा, गणराजा, हे मोरया तू
सुखकर्ता, दुखहर्ता माझ्या मनाचा तू

गणनायका देवा, शुभदायका, मोरेश्वरा बा तू
लंबोदरा, विघ्नेश्वरा, गणदैवता रे तू



Credits
Lyrics powered by www.musixmatch.com

Link