Mandire Suni Suni

मंदिरे सुनी-सुनी...
मंदिरे सुनी-सुनी कुठे न दीप काजवा
मेघवाही श्रावणात ये सुगंधी गारवा
मंदिरे सुनी-सुनी...
सुनी-सुनी, सुनी-सुनी

रात्र सूर पेरुनी अशी हळूहळू भरे
रात्र सूर पेरुनी अशी हळूहळू भरे
समोरच्या धुक्यातली उठून चालली घरे
समोरच्या धुक्यातली उठून चालली घरे

मंदिरे सुनी-सुनी...
सुनी-सुनी, सुनी-सुनी

गळ्यात शब्द गोठले, अशांतता दिसे घनी
गळ्यात शब्द गोठले, अशांतता दिसे घनी
दुःख बांधुनी असे क्षितीज झाकिले कुणी?
दुःख बांधुनी असे क्षितीज झाकिले कुणी?

मंदिरे सुनी-सुनी...
सुनी-सुनी, सुनी-सुनी

एकदाच व्याकुळा प्रतीध्वनीत हाक दे
एकदाच व्याकुळा प्रतीध्वनीत हाक दे
देह कोसळून हा नदीत मुक्त वाहू दे
देह कोसळून हा नदीत मुक्त वाहू दे

मंदिरे सुनी-सुनी...
सुनी-सुनी, सुनी-सुनी



Credits
Writer(s): Mangeshkar Hridyanath, N/a Graes
Lyrics powered by www.musixmatch.com

Link