Jaidev Datta Avdhuta

जय देव, जय देव दत्ता-अवधूता
हो, स्वामी अवधूता
जोडुनी कर तंव चरणी ठेवितो माथा
जय देव, जय देव

(जय देव, जय देव दत्ता-अवधूता)
(हो, स्वामी अवधूता)
(जोडुनी कर तंव चरणी ठेवितो माथा)
(जय देव, जय देव)

अवतरसी तू येता धर्मा ते ग्लानी
नास्तिकानाही तू लाविसी निजभजनी
दाविसी नाना लीला असंख्य रुपानी
हरिसी दीनांचे तू संकट दिनरजनी

(जय देव, जय देव दत्ता-अवधूता)
(हो, स्वामी अवधूता)
(जोडुनी कर तंव चरणी ठेवितो माथा)
(जय देव, जय देव)

यवनस्वरुपी एक्या दर्शन त्वां दिधले
संशय निरसुनिया तदद्घैता घालविले
गोपीचंदा मंदा त्वांची उद्घरिले
मोमिन वंशी जन्मुनी लोका तारियले

(जय देव, जय देव दत्ता-अवधूता)
(हो, स्वामी अवधूता)
(जोडुनी कर तंव चरणी ठेवितो माथा)
(जय देव, जय देव)

भेद न तत्वी हिंदूयवनांचा काही
दावायासी झाला पुनरपि नरदेही
पाहसी प्रेमाने तू हिंदूयवनाही
दाविसी आत्मत्वाने व्यापक हा साई

(जय देव, जय देव दत्ता-अवधूता)
(हो, स्वामी अवधूता)
(जोडुनी कर तंव चरणी ठेवितो माथा)
(जय देव, जय देव)

देवा साईनाथा त्वत्पदनत व्हावे
परमायामोहित जनमोचन क्षणी व्हावे
त्वत्कृपया सकलांचे संकट निरसावे
देशील हरी दे त्वत्यश कृष्णाने गावे

(जय देव, जय देव दत्ता-अवधूता)
(हो, स्वामी अवधूता)
(जोडुनी कर तंव चरणी ठेवितो माथा)
(जय देव, जय देव)



Credits
Writer(s): Nandu Honap
Lyrics powered by www.musixmatch.com

Link