Dis Naklat Jaai

दिस नकळत जाई, दिस नकळत जाई
दिस नकळत जाई, सांज रेंगाळून राही
दिस नकळत जाई

दिस नकळत जाई
दिस नकळत जाई, सांज रेंगाळून राही
क्षण एक ही ना ज्याला तुझी आठवण नाही
दिस नकळत जाई, दिस नकळत जाई

भेट तुझी ती पहिली लाख-लाख आठवतो
भेट तुझी ती पहिली लाख-लाख आठवतो
रूप तुझे ते धुक्याचे कण-कण साठवतो
रूप तुझे ते धुक्याचे कण-कण साठवतो

वेड सखी-साजणी हे, वेड सखी-साजणी हे
मज वेडावून जाई
क्षण एक ही ना ज्याला तुझी आठवण नाही
दिस नकळत जाई, हो, दिस नकळत जाई

असा भरून ये ऊर जसा वळीव भरावा
अशी हूरहूर जसा गंध रानी पसरावा
असा भरून ये ऊर जसा वळीव भरावा
अशी हूरहूर जसा गंध रानी पसरावा

रान मनातले माझ्या, रान मनातले माझ्या
मग भिजूनिया जाई
क्षण एक ही ना ज्याला तुझी आठवण नाही
दिस नकळत जाई, हो, दिस नकळत जाई

आता अबोध मनाची अनाकलनीय भाषा
आता अबोध मनाची अनाकलनीय भाषा
जशा गूढ-गूढ माझ्या तळहातावर रेषा
जशा गूढ-गूढ माझ्या तळहातावर रेषा

असे आभाळ-आभाळ, असे आभाळ-आभाळ
रोज पसरून राही
क्षण एक ही ना ज्याला तुझी आठवण नाही
दिस नकळत जाई, दिस नकळत जाई

सांज रेंगाळून राही
क्षण एक ही ना ज्याला तुझी आठवण नाही
दिस नकळत जाई, दिस नकळत जाई
दिस नकळत जाई, हो, दिस नकळत जाई

दिस नकळत जाई, दिस नकळत जाई
दिस नकळत जाई...



Credits
Writer(s): Saumitra, Milind Madhav Ingle
Lyrics powered by www.musixmatch.com

Link