Aabhalachya Gavala

आभाळाच्या गावाला खेळू चला लगोऱ्या
चांदोबाचा चेंडू घ्या, डोंगराच्या भिंगोऱ्या
बर्फाचे फुगे हिमशिखरावर उभे
हिमगौरीचे झगे हे इथे कोणी टांगले?
उंच माथ्यावर आहे ढगोबाचे घर
त्याला नाही रे छप्पर असे कोणी बांधले?

रे वाह, रे वाह, रे वाह
या आकाशाच्या पतंगाला मांझा बांधूया रे, वाह
या डोंगराच्या डोक्यावरचा आंदोबाचा टप्पा मारूया रे, वाह

या डोंगराच्या डोक्यावरचा आंदोबाचा टप्पा मारूया

आले हे कुठूनी ऊन, पाणी, माती?
कुणी जोडली ही माणसांची नाती?
स्वप्नांचे थवे त्याला रंग ही नवे
मला सारेचं हवे, हे चित्र कुणी काढले?
द्या पटकन उत्तर, हा तपकिरी पत्थर
याला वाऱ्याचे अत्तर इथे कुणी लावले?

रे वाह, रे वाह, रे वाह
या आकाशाच्या पतंगाला मांझा बांधूया रे, वाह
या डोंगराच्या डोक्यावरचा आंदोबाचा टप्पा मारूया रे, वाह
या आकाशाच्या पतंगाला मांझा बांधूया रे, वाह
या डोंगराच्या डोक्यावरचा आंदोबाचा टप्पा मारूया

युगामागुनी ही चालली युगे
हे क्षण ती जुनी थांबलेले
आनंदाची नाव तिचं पैलतीरी गावं
त्याचं लागे ना रे ठाव, हे कोडे कुणी घातले?
नाही थाऱ्यावर, मन गेले वाऱ्यावर
जसं पाऱ्यावर थेंब दवाचा पडे

रे वाह, रे वाह
या आकाशाच्या पतंगाला मांझा बांधूया रे, वाह
या डोंगराच्या डोक्यावरचा आंदोबाचा टप्पा मारूया रे, वाह
या आकाशाच्या पतंगाला मांझा बांधूया रे, वाह
या डोंगराच्या डोक्यावरचा आंदोबाचा टप्पा मारूया

Credits
Writer(s): Siddharth, Gajendra Ahire, Soumil
Lyrics powered by www.musixmatch.com

Link