Parikatha

परिकथेच्या पऱ्या होऊनी खऱ्या
उतरल्या चंद्रावरुनी
ओ-हो, परिकथेच्या पऱ्या होऊनी खऱ्या
उतरल्या चंद्रावरुनी

खबर नवी ही जरा, मला बावरा
अचानक गेल्या करुनी
कुठून आले धुके?
गुलाबी जादू कशी झाली अशी

इथे बघू का तिथे? नजर अडखळे
झुळूक हर जाते हसुनी
परिकथेच्या पऱ्या होऊनी खऱ्या
उतरल्या चंद्रावरुनी

बेभान उडतात फुलपाखरे
रंगात वाहून मन बावरे
ओ-हो, बेभान उडतात फुलपाखरे
रंगात वाहून मन बावरे

हलकी नशा रोज हाती उरे
दुनिया खरी की इशारे खरे?
कळे तरी ना वळे
खुळावे काया, अशी माया जशी

इथे बघू का तिथे? नजर अडखळे
झुळूक हर जाते हसुनी
परिकथेच्या पऱ्या होऊनी खऱ्या
उतरल्या चंद्रावरुनी

तारे नी वारे गुलाबी हवे
वाऱ्या सवे गंध येती नवे
ओ-हो, तारे नी वारे गुलाबी हवे
वाऱ्या सवे गंध येती नवे

बेधुंदी स्वप्नात ही जागवे
नजरेत सलगीचे लाखों दिवे
जुळे तरी ना मिळे
हवेसे वाया, नको जाया आता

इथे बघू का तिथे? नजर अडखळे
झुळूक हर जाते हसुनी
परिकथेच्या पऱ्या होऊनी खऱ्या
उतरल्या चंद्रावरुनी



Credits
Writer(s): Ashwini Shende, Nilesh Moharir
Lyrics powered by www.musixmatch.com

Link