Rusva Fugwa

रुसवा-फुगवा खोटा नखरा
किती गोड चेहरा तुझा
बघना वळूनी अगं, ए तरुणी
तू राणी, मी राजा तुझा
तू चंद्रमुखी, तू माझी सखी
तू स्पर्शातील गोड गाणी
हसताना ओठांची मन हे का थांबते?

अजूनही गालावर खळी लाजते
तू जशी मला हवी तशी दिसते

जाऊ पुन्हा बागेमध्ये, गाठू जुना कोपरा
हातामधी दे-दे हाथ तू सूर्यास्त पाहू जरा
जन्माच्या या साऱ्या रेशीमगाठी
होऊन जाऊ दे पुन्हा तीच मिठी
भुरभुरत्या केसात मन हे का गुंतते?

अजूनही गालावर खळी लाजते
तू जशी मला हवी तशी दिसते

बिलगून तू बस पाठीशी, जाऊया long drive ला
प्रेमात मी वेडा तुझ्या सांगू कितीदा तुला?
करतो packing चल honeymoon ला
Photo काढू बर्फामधला
केसांच्या रंगानी जगणे का थांबते?

अजूनही गालावर खळी लाजते
तू जशी मला हवी तशी...



Credits
Writer(s): Ambarish Deshpande, Abhijeet Narvekar
Lyrics powered by www.musixmatch.com

Link