Swarg Ha Nava

स्वर्ग हा नवा वाटतो हवा
साथ ही तुझी, जणू उन्हात चांदवा
स्वर्ग हा नवा वाटतो हवा
साथ ही तुझी, जणू उन्हात चांदवा

ऐक साजणी, या खुळ्या क्षणी
वेड लावतो जीवा तुझाच गोडवा
स्वर्ग हा नवा

चिमणे घरटे सजले साजरे
इवले सुख हे फुलले आज रे
भरले घर हे आनंदाने
मन हे गाते गीत तुझे ऐक ना

प्रेम गीत छेडितो उरात पारवा
ऐक साजणी, या खुळ्या क्षणी
वेड लावतो जीवा तुझाच गोडवा
स्वर्ग हा नवा

बघुनी अपुले घर स्वप्नातले
सजणी झुलले, तन-मन नाचले
जुळले नाते दोन जीवांचे
जीव हे झाले एकरूप, साजणा

साथ ही तुझी, जणू उन्हात चांदवा
स्वर्ग हा नवा वाटतो हवा
साथ ही तुझी, जणू उन्हात चांदवा
स्वर्ग हा नवा...



Credits
Writer(s): Atul Gogavale, Ajay Gogavale, Guru Thakur
Lyrics powered by www.musixmatch.com

Link