Tujhya Prematach Rahude

मला तुझ्यातच राहूदे
तुझ्या प्रेमातच राहूदे
तुझ्या विना एक क्षण ही
मन माझे राहिना
मला तुझ्यातच राहूदे
तुझ्या प्रेमातच राहूदे

वेडावल्या भावना या
गुंतलेले शब्द सारे
तू नसतांना मन बावरे
ह्रदयात का धडधढे
साऱ्याच त्या आठवणी
अश्रुंतुनी का पडे
त्यांना डोळ्यांत च राहूदे
मला तुझ्यातच राहूदे
तुझ्या प्रेमातच राहूदे

सांगताना ही त्रास होतो
नेहमी तुझा भास होतो
काय झाले सांग ना तू
मी तर तुझा श्वास होतो
एकदा तू ये पुन्हा अन
गाणे पूर्वीचेच गा म्हण
मन मोकळे होउदे

मला तुझ्यातच राहूदे
तुझ्या प्रेमातच राहूदे

मी असेल वा नसेल ही
प्रेम होते प्रेम आहे
प्रेम राहील सांगतो मी
फक्त राहील भेटणे

मला तुझ्यातच राहूदे
तुझ्या प्रेमातच राहूदे



Credits
Writer(s): Santosh Sawant
Lyrics powered by www.musixmatch.com

Link