Kadhi Ghatavar Nadit

ए, आदेश, मनीष, चला-चला बाहेर निघा घरातुन
अगं नाय रे, आई नाय ओरडनार, चला लवकर
चला-चला पाऊस आलय मोठा
चला भिजुया

येरे-येरे पावसा, तुला देतो पैसा
पैसा झाला खोटा, पाऊस आला मोठा
येरे-येरे पावसा, तुला देतो पैसा
पैसा झाला खोटा, पाऊस आला मोठा

कधी घटावर...
कधी घटावर, नदी तटावर
पाचूंच्या हिरव्या बेटावर
पाऊस करितो वस्ती
उडवीत पाणी, भिजवित कोणी
घन पांघरल्या हिरव्या रानी
पोरे करीती मस्ती

कधी घटावर, नदी तटावर
पाचूंच्या हिरव्या बेटावर
पाऊस करितो वस्ती
उडवीत पाणी, भिजवित कोणी
घन पांघरल्या हिरव्या रानी
पोरे करीती मस्ती
कधी घटावर, नदी तटावर

टप-टप, टप-टप थेंब टपोरे
तळहातावर झेलती पोरे
होड्या होऊनी तरंगत जाती
पाण्यावरती कागद कोरे

टप-टप, टप-टप थेंब टपोरे
तळहातावर झेलती पोरे
होड्या होऊनी तरंगत जाती
पाण्यावरती कागद कोरे

पाऊस वेडा, काढीत खोड्या
पट्टसरींच्या बुडवित होड्या
घाली नदीला गस्ती

उडवीत पाणी, भिजवित कोणी
घन पांघरल्या हिरव्या रानी
पोरे करीती मस्ती
कधी घटावर, नदी तटावर

भरभर वाहती भिजले वारे
भरभर वाहती भिजले वारे
झरझर उन्हात येती फवारे
हलके-हलके कवेत घेती
तृषार्तलेले डोंगर सारे

झोपडी वाड्या, इमले माड्या
भिजवून आता नाचे वेड्या
पाऊस रस्तो रस्ती

उडवीत पाणी, भिजवित कोणी
घन पांघरल्या हिरव्या रानी
पोरे करीती मस्ती

कधी घटावर, नदी तटावर
पाचूंच्या हिरव्या बेटावर
पाऊस करितो वस्ती
उडवीत पाणी, भिजवित कोणी
घन पांघरल्या हिरव्या रानी
पोरे करीती मस्ती

कधी घटावर, नदी तटावर
पाचूंच्या हिरव्या बेटावर
पाऊस करितो वस्ती
उडवीत पाणी, भिजवित कोणी
घन पांघरल्या हिरव्या रानी
पोरे करीती मस्ती

कधी घटावर, नदी तटावर (येरे-येरे पावसा, तुला देतो पैसा)
(पैसा झाला खोटा, पाऊस आला मोठा)
(येरे-येरे पावसा, तुला देतो पैसा)
(पैसा झाला खोटा, पाऊस आला मोठा)



Credits
Writer(s): Vivek Tendulkar, Aarti Gosavi
Lyrics powered by www.musixmatch.com

Link