Tuzha Mazhashi Naata He Asa Kasa Aahe

तुझं माझ्याशी नात हे असं-कसं आहे?
कोण कोठला रे तू, तुझी कोण मी आहे?
तुझं माझ्याशी नात हे असं-कसं आहे?
कोण कोठला रे तू, तुझी कोण मी आहे?

गतजन्मीचे नाते हे नक्की काय आहे?
ना ठाव मला, ना ठाव तुला
हो, ना ठाव मला, ना ठाव तुला

या झोपडीत माझ्या हाताचा पाळणा
आकाशी छताला चंद्राचा खेळणा
डुलुडुलू हाले मऊ मांडीचा बिछाना
पदरात फाटक्या माया ही माइना
एकही श्वास तुझ्याविन जाईना

गतजन्मीचे नाते हे नक्की काय आहे?
ना ठाव मला, ना ठाव तुला
ना ठाव मला, ना ठाव तुला

मी तुझं पिल्लू गं, तू माझी चिमणी
मी तुझं रोपटं, तू माझी धरणी
मी मातीचा गोळा गं, तू माझा कुंभार
तुझ्या रूपाने देवच आला बनून पालनहार

दिलास पहिला श्वास, पहिला तूच भरविला घास
दुडदुडणारे पाऊल पहिले आणि बोबडे बोल
गोष्ट परीची ऐकून उमलले हासू
मज भूक लागता प्रेमाचा फुटतो पान्हा
Hmm, यालाच कदाचित आई म्हणतात ना गं

गतजन्मीचे नाते हे नक्की काय आहे?
हे ठाव मला, हे ठाव तुला
हे ठाव मला, हे ठाव तुला



Credits
Writer(s): Ashok Patki, Samrudhi Pore
Lyrics powered by www.musixmatch.com

Link