Dadacha Lagin

मांडव दारात, वराडी तोऱ्यात
निगाले बेगीन, निगाले बेगीन

मांडव दारात, वराडी तोऱ्यात
निगाले बेगीन, निगाले बेगीन
हळदीच्या अंगान घराला झालिया
सुखाची लागेन, सुखाची लागेन

मानाचे-पानाचे आवतान धाडून
नात्याचे-पुत्याचे जमले झाडून
मानाचे-पानाचे आवतान धाडून
नात्याचे-पुत्याचे जमले झाडून

नटून करवली मायंदाळ चिली-पिली
दनानू गं डीजे-फिजे
धिन-तारा, धिन-तारा, धा-किनी, धि-किनी

आमच्या दादाचं, माझ्या भावाचं
माझ्या पुतन्याचं, माझ्या मित्राचं लगीन
माझ्या दादाचं लगीन, माझ्या भावाचं लगीन
माझ्या पुतन्याचं लगीन, माझ्या दोस्ताचं लगीन

अंगणी चाहुल, हो, मेंदीचं पाऊल
चढवा तोरन हळदीच्या अंगान
हळव्या मायेला फुटंल पाझरं
भिजलं पदरं वाजत-गाजत

घराला झालिया सुखाची लागनं
हे, खराले आंदन सुखाचे गोंदनं

माझ्या भावाचं, माझ्या दादाचं
माझ्या पुतन्याचं, माझ्या मित्राचं लगीन
माझ्या भावाचं लगीन, माझ्या दादाचं लगीन
माझ्या पुतन्याचं लगीन, माझ्या दोस्ताचं, हे, लगीन

ए, म्हातारी-कोतारी, शेजारी-पाजारी टेचात नाहीतर
भैताड-पेताड, सोयरे-धायरे समदेचं hyper
सफारी-गिफारी घालून नवरा मारीतो fashion

माझ्या दादाचं (अरे, केलं का?), माझ्या भावाचं (अरे, मग?)
माझ्या पुतन्याचं (अरे, मग काय?), माझ्या मित्राचं लगीन
माझ्या भावाचं लगीन, माझ्या दोस्ताचं लगीन
आमच्या मुक्याचं लगीन, आमच्या मुक्याचं लगीन
आमच्या मुक्याचं लगीन, आमच्या मुक्याचं, अरे, लगीन



Credits
Writer(s): Guru Thakur, Amit B Sawant
Lyrics powered by www.musixmatch.com

Link