Jaato

जे वाटते मला मी बोलून जातो
भावनांना शब्दात माळून जातो
जे खटकते तुला मी टाळून जातो
जे बोचती तुला शब्द गाळून जातो
तू पाहते मला मी भाळून जातो
उपवास नजरेचा मी पाळून पाहतो
मी आवडे तुला मी कळून जातो
पीठ अफवांचे मी दळून जातो
कधी अफवेत त्या मी जळून जातो
कधी प्रेमात ह्या मी मळून जातो
तू रागावतेस ना मी पळून जातो
तू चिडतेस ना मी छळून जातो
नकार हा तुझा मी गिळून जातो
स्वतःलाच स्वतः मी सळून जातो
नको तू मला मी निघून जातो
शेवटचे एकदा बिलगून जातो
सोडताना तुला मी वळून पाहतो
कोसावर तू मी जवळून पाहतो



Credits
Writer(s): Pankaj Harad
Lyrics powered by www.musixmatch.com

Link