Ghe Na Kavet

घे ना, कवेत घे ना...
घे ना, कवेत घे ना, मी मोहरून आले
घे ना, कवेत घे ना, मी मोहरून आले

हे बंध रेशमाचे...
हे बंध रेशमाचे आपुले जुळून आले
घे ना, कवेत घे ना, मी मोहरून आले
घे ना, कवेत घे ना...

बाहूत घे मला तू, सांगू कसे तुला मी?
बाहूत घे मला तू, सांगू कसे तुला मी?
बाहूत घे मला तू, सांगू कसे तुला मी?
गाली गुलाब माझ्या आता खुलून आले
गाली गुलाब माझ्या आता खुलून आले

हे बंध रेशमाचे आपले जुळून आले
घे ना कवेत, घे ना मी मोहरून आले

चंद्रावरी कशाची...
चंद्रावरी कशाची छाया दिसून येते?
चंद्रावरी कशाची छाया दिसून येते?
संभार मोकळा मी...
संभार मोकळा मी माझा करून आले
संभार मोकळा मी माझा करून आले

हे बंध रेशमाचे आपुले जुळून आले
घे ना, कवेत घे ना, मी मोहरून आले

बरसात अमृताची...
बरसात अमृताची करण्यास सज्ज मी ना
...करण्यास सज्ज मी ना
ह्या चांदण्यात, सख्या...
ह्या चांदण्यात, सख्या, साकी बनून आले
ह्या चांदण्यात, सख्या, साकी बनून आले

घे ना, कवेत घे ना, मी मोहरून आले
घे ना, कवेत घे ना, मी मोहरून आले
हे बंध रेशमाचे आपुले जुळून आले
घे ना, कवेत घे ना...



Credits
Lyrics powered by www.musixmatch.com

Link