Karaar Premache - Male Version

कसे निराळे हे करार प्रेमाचे?
कुणास बोलावे मनातले सारे?
कसे निराळे हे करार प्रेमाचे?
कुणास बोलावे मनातले सारे?

तू रोज दिन-रात हाकेवरी
तरी भास होती विरहाचे
कसे निराळे हे करार प्रेमाचे?
कुणास बोलावे मनातले सारे?

तुझ्या चाहुलीला आतुर मन माझे
तुझ्याविना आनंदाचे क्षण ओझे
गुंतवून विरले का हे धागे सुखाचे?
असे एकट्याने जीणे नको कधी

उनाड नात्याला नव्याने जोडावे
कुणास बोलावे मनातले सारे?

वाटे कधी विसरून सारे बिलगावे
तुझ्या सोबतीने मी ही मिरवावे
सावरूण तगमग सारी वेड्या मनाची
असे आज फिरुनी मागे यावे कसे?

बहर भेटीचे मनात मोजावे
कुणास बोलावे मनातले सारे?

कसे निराळे हे करार प्रेमाचे?
कुणास बोलावे मनातले सारे?
कसे निराळे हे करार प्रेमाचे?
कुणास बोलावे मनातले सारे?



Credits
Writer(s): Mangesh Balkrishna Kangane, Tony Kakkar
Lyrics powered by www.musixmatch.com

Link