Paul Padla Chorich

लगबघत आली महालात एक नार गुलजार
आनं, ओठावर डाळींब तिच्या, गाली अंजीर
हे, दुधावाणी काया तिची कापी थरथर
आनं, महालात कोण आली ही नक्षी सुंदर?
नक्षी सुंदर, नक्षी सुंदर, हा

हो, आधी भीती व्हती मला आल्या-गेल्याची
टकमक-टकमक डोळ्याची
आता फिकिर ना मला कुणा बाप्याची

जवा पाउल पडला चोरीचं
जवा पाउल पडला चोरीचं
जवा पाउल पडला चोरीचं

हो, माझ्या सरज्या तू रं
माझ्या राज्या तू रं

(हिचं पाउल पडला चोरीचं)
(हिचं पाउल पडला चोरीचं)
(हिचं पाउल पडला चोरीचं)

फूलबाजा हा देहाचा
शिणगार करुन सजवला
त्यानं देऊन मनासं हिसका
भर रातीत घोटाळा केला
ना भान राही, ध्यान राही ना, आता राम गं

हो, बाई, तुम्ही रात्री येणार का?
गुपित काय आम्हा सांगल का?
हा द्या जरा हिसाब घेतल्या दिल्याचा
हा द्या जरा हिसाब घेतल्या दिल्याचा

हो, बाई तुम्ही रात्री येणार का?
गुपित काय आम्हा सांगल का?

बांगळी फुटली, जोळवी टचकली
काई लाभ झालं
काय म्हणावं रात राणीला?
जाई नव्ह केलं

(हिचं पाउल पडला चोरीचं)
(हिचं पाउल पडला चोरीचं)
(हिचं पाउल पडला चोरीचं)

वय सोळाचं आला हो जसं
जवानीची ही नागीन डस
देत आळोखा-बिळोखा फस
जेव्हा पिरतीची वाजते बीन
ना भान राही, ध्यान राही ना, आता राम गं

हो, बाई, तुम्ही हात पकडाल का?
गाडीवर सांगा बसणार का?
ए, जाऊ थोडं, फिरू गं लपून-छपून
बघू दे त्या लोकासनी डोळं तपून

हो, बाई, तुम्ही हात पकडाल का?
गाडीवर सांगा बसणार का?

चार जंगलात गाडी वळण बघतोय
करून किरकी मान
काय म्हणावं या हरिणीला
काही ही नवं केलं

(हिचं पाउल पडला चोरीचं)
(हिचं पाउल पडला चोरीचं)
(हिचं पाउल पडला चोरीचं)



Credits
Writer(s): V Sanap
Lyrics powered by www.musixmatch.com

Link