Mata Jagdamba He Amba

(माता जगदंबा, हे अंबा माहुरगडची माता)
(माहुरगडची माता रक्षण करी भक्ता)
(रक्षण करी भक्ता, भक्ता दे ममता)

आरती पंचप्राणे ओवाळीतो चरणा, ओवाळीतो चरणा
जय जय जय जगदंबा, जय जय जय जगदंबा
माहुरगडवासी अंबा

नवरात्री, नवरूपे धारूनी रक्षक तू झाली (रक्षक तू झाली)
भक्तगणांच्या हृदयी आई रुपे तू वसली (रुपे तू वसली)

ते हृदयासन पावन भावे रमवुनी भक्तांना, रमवुनी भक्तांना
आरती पंचप्राणे, आरती पंचप्राणे ओवाळीतो चरणा

(माता जगदंबा, हे अंबा माहुरगडची माता)
(माहुरगडची माता रक्षण करी भक्ता)
(रक्षण करी भक्ता, भक्ता दे ममता)

असुरासी निर्दाळून माते तू झाली जननी (तू झाली जननी)
आनंद भक्तावरी पूजीती तुला सुमनी (तुला सुमनी)

अश्विन प्रतीप देला वैभव बघतांना, वैभव बघतांना
आरती पंचप्राणे, आरती पंचप्राणे ओवाळीतो चरणा

(माता जगदंबा, हे अंबा माहुरगडची माता)
(माहुरगडची माता रक्षण करी भक्ता)
(रक्षण करी भक्ता, भक्ता दे ममता)

शुंभणी शुंभापरी दैत्यत्वा सहज लिले वधीले (सहज लिले वधीले)
नवदिन अखंड झगडुनी मोक्षपदी नेले (मोक्षपदी नेले)
दत्तात्रय अत्री अनसूया परशरामपरी भूषण नेले (भूषण नेले)

स्वर्गीचा तो दिव्य सोहळा दशमी दिनी जाणा
दशमी दिनी जाणा
आरती पंचप्राणे, आरती पंचप्राणे ओवाळीतो चरणा

(माता जगदंबा, हे अंबा माहुरगडची माता)
(माहुरगडची माता रक्षण करी भक्ता)
(रक्षण करी भक्ता, भक्ता दे ममता)

पावन हो तेथे आदिशक्ती तू अनादीरूपे (शिवशक्ती भूषणा)
राधासूत करी आरती नित्यनिमित चरणा (नित्यनिमित चरणा)

जय जय जय जगदंबा, माहुरगडवासी अंबा
माहुरगडवासी अंबा
आरती पंचप्राणे, आरती पंचप्राणे ओवाळीतो चरणा

(माता जगदंबा, हे अंबा माहुरगडची माता)
(माहुरगडची माता रक्षण करी भक्ता)
(रक्षण करी भक्ता, भक्ता दे ममता)

(माता जगदंबा, हे अंबा माहुरगडची माता)
(माहुरगडची माता रक्षण करी भक्ता)
(रक्षण करी भक्ता, भक्ता दे ममता)

(माता जगदंबा, हे अंबा माहुरगडची माता)
(माहुरगडची माता रक्षण करी भक्ता)
(रक्षण करी भक्ता, भक्ता दे ममता)



Credits
Writer(s): Milind More, Arun Kachre
Lyrics powered by www.musixmatch.com

Link